Ad will apear here
Next
‘‘कानसेन’ची सांगीतिक चळवळ राज्यभर पोहोचावी’


रत्नागिरी :
‘सोशल मीडियाच्या गैरवापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत; मात्र त्याच वेळी व्हॉट्सअॅपचा वापर चांगल्या कामासाठीही करता येतो, त्यातून राज्यभरातील माणसे एकत्र जोडली जाऊन एक चळवळ उभी राहते, हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे. ‘कानसेन’ची सांगीतिक चळवळ रत्नागिरीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचावी,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केली. ‘कानसेन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या रत्नागिरीत झालेल्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.



३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले. ‘कानसेन’ ग्रुपचे राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले, तसेच रत्नागिरीकर सदस्य या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ संवादिनी-ऑर्गनवादक तुळशीदास बोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरेल नांदीने संमेलनाचे प्रथम सत्र सुरू झाले. मग दिवसभरात विविध व्यावसायिक कलाकारांसह हौशी सदस्यांनी आपली कला पेश केली. ‘बाथरूम सिंगर’ ते शास्त्रीय गायक या सर्वांसाठी सादरीकरणाची समान संधी हे संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.

संगीतशिक्षक विजय रानडे आणि तबलावादक हेरंब जोगळेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ‘सलग तीन वर्षे हे संमेलन रत्नागिरीत उत्कृष्टपणे घेतले गेले. पुढील संमेलनाची जबाबदारी अन्य शहरातील सदस्यांनी घ्यावी,’ असे सुधीर मोघे यांनी सुचविले. लहान मुलांचे सांगीतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, कराओके शो, सुगम संगीत मैफल अशा विविध सत्रांमध्ये संमेलन पार पडले. संगीतकार अवधूत बाम आणि गझलकार सुरेश दंडे यांनी अभंग आणि गझल सादर करून संमेलनाची सांगता केली.

वेगवेगळ्या सत्रांतील कार्यक्रमांचे नियोजन, तालीम आदी जबाबदारी तेजस्विनी गाडगीळ, आशिष खेर, अदिती जोशी, रुद्र गाडगीळ, संजय पाटणकर, प्रवीण डोंगरे, पिंट्या चव्हाण, मंगेश मोरे, महेंद्र पाटणकर, पांडुरंग बर्वे, सोनाली कानिटकर यांनी पार पाडली. सांगीतिक कार्यक्रमांसाठी हेरंब जोगळेकर, विजय रानडे, राजेंद्र भडसावळे, पांडुरंग बर्वे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, गणेश घाणेकर, मंदार जोशी, उदय गोखले, विजय रानडे, राजू धाक्रस, अमेय भडसावळे, मंदार घैसास, वरद सोहनी यांनी साथसंगत केली. सहभोजनानंतर पुढच्या वर्षी पुन्हा प्रत्यक्ष भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देऊन साऱ्यांनी निरोप घेतला.



रांगोळी, सजावट, हिशेब, चहा-नाश्ता, भोजन आदी व्यवस्था स्वाती रानडे, तेजस्विनी गाडगीळ, विश्वास जोगळेकर, प्रसाद गाडगीळ, किरण जोशी, अंबर हॉलचे मालक आणि ‘कानसेन’ समूहाचे अॅडमिन संजीव वेलणकर, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत आणि त्यांचे कर्मचारी यांनी चोख बजावली. फोटो आणि शूटिंग व्यवस्था संजय शिंदे आणि ओम पाडळकर यांनी, तर ध्वनिव्यवस्था राजू बर्वे यांनी पाहिली.






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZWFBT
Similar Posts
बहारदार कार्यक्रमांनी कानसेन संमेलन रंगले! रत्नागिरी : ‘कानसेन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचे चौथे संमेलन नुकतेच रत्नागिरीत पार पडले. यात सांगीतिक कार्यक्रमांसह विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आले. शास्त्रीय गायक ते बाथरूम सिंगर या सर्वांसाठी सादरीकरणाची समान संधी हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते. रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद,
रत्नागिरीत १५ सप्टेंबरला ‘कानसेन’ ग्रुपचे चौथे स्नेहसंमेलन रत्नागिरी : एखादी गोष्ट वायुवेगाने पसरण्यासाठी व्हॉट्सअॅप हे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. व्हॉट्सअॅपवरच चार वर्षांपूर्वी ‘कानसेन’ हा संगीतप्रेमींचा एक ग्रुप तयार झाला. त्याद्वारे राज्यभरातील विविध ठिकाणचे लोक जोडले गेले. त्यातून दर वर्षी कानसेन संमेलन होऊ लागले. यंदा या संमेलनाचे सलग चौथे वर्ष असून,
सोशल मीडियावरच्या ‘कानसेनां’चे रत्नागिरीत संमेलन रत्नागिरी : सोशल मीडियामुळे माणसे दुरावत चालल्याची खंत अनेकांकडून व्यक्त केली जाते. काही प्रमाणात ती खरीही आहे; मात्र तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो, त्यावर ते चांगले की वाईट हे ठरते. सोशल मीडियाचा चांगला वापर केला, तर ते माणसे जोडतेच, हे ‘कानसेन’ ग्रुपवरून कळते. ‘कानसेन’ या संगीतप्रेमींच्या व्हॉट्सअॅप
स्वराभिषेक दीपावली संध्या २०२० । भाग १ (व्हिडिओ) 'स्वराभिषेक'तर्फे दर वर्षी रत्नागिरीत दिवाळी पहाटची सांगीतिक मैफल आयोजित केली जाते. यंदा करोनामुळे ती प्रथा खंडित होऊ नये, यासाठी दीपावली संध्या हा कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आला आहे. त्या मैफलीचा हा पहिला भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language